ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत, १४४ कलम लागू

0
452

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला या दोघांसह नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या सगळ्या माजी मंत्र्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जम्मूकाश्मीरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले असून फोन, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

काश्मीरमधल्या राजकीय घडामोडींबाबत फारुक अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

नजरकैदेच्या कारवाईवर मेहबुबा मुफ्ती यांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही शांतीच्या मार्गाने जाणारे नेते आहोत आम्हाला आमच्या घरात नजरकैदेत ठेवले आहे ही बाब निषेधार्ह आहे असे ट्विट मेहबुबा मुफ्ती यांनी केले आहे. तसेच आज आपल्याला अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण झाल्याचे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.