पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक

0
387

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ हटवण्यासंदर्भात चर्चा झाली असेल, असा अंदाज आहे.

या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हजर होते. तत्पूर्वी काश्मीरमधील तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांची भेट घेतली.

जम्मूकाश्मीर सरकारने रविवारी लागू केलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तर श्रीनगरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. जम्मूतील जिल्ह्यांमध्ये लष्कराच्या ४० कंपनी तैनात करण्यात आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवले आहे.