ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालणार नाही, लोकसंख्येनुसार मिळणार राजकीय आरक्षण – मुख्यमंत्री

0
499

नागपूर, दि. ३ (पीसीबी) – ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालणार नाही, लोकसंख्येनुसार ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, राज्यात झेडपीमध्ये अनेक वर्षं ओबीसींना आरक्षण आहे. २७ टक्के आरक्षण मागास प्रवर्गाला आहे. ज्या ठिकाणी एससी, एसटी आरक्षण २३ टक्के पेक्षा जास्त आहे. तिथे राजकीय आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तसं आरक्षण देणं संवैधानिक नाही. तिथे आरक्षण देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. यानंतर सरकार सुप्रीम कोर्टात गेले. कोर्टाला सांगितलं की ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व मिळेल अशी व्यवस्था केली. निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की जनगणनेनुसार ओबीसींची किती लोकसंख्या आहे त्याची माहिती नाही, त्यामुळे आरक्षण देता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने आम्हाला याची माहिती देण्यासाठी किती वेळ लागेल याची विचारणा केली आहे. त्याची सुनावणी पुढील आठवड्यात आहे.