एल्गार परिषदेच्या चिथावणीखोर भाषणांमुळेच कोरेगाव भीमा हिंसाचार – पुणे पोलीस

0
1152

पुणे, दि. ४ (पीसीबी) – एल्गार परिषदेत झालेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमा हिंसाचार उफाळून आला, असा ठपका पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर ठेवला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या चौकशी आयोगासमोर पुणे शहर पोलिसांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे.

अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी पुणे शहर पोलिसांच्या वतीने शुक्रवारी (दि.२) चौकशी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले. सेनगावकर यांच्या हद्दीत एल्गार परिषदेचे आय़ोजन करण्यात आले होते. या प्रतिज्ञापत्रात एल्गार परिषदेतील चिथावणीखोर भाषणे, त्या भाषणांविरोधात दाखल झालेले एफआयआरची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचारावर कोणत्याही शासकीय संस्थेकडून पहिल्यांदाच एल्गार परिषदेवर हिंसाचाराचा थेट ठपका ठेवण्यात आला आहे. या हिंसाचारासाठी एल्गार परिषदेचे आयोजक जबाबदार असल्याचे सेनगावकर यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले असून या परिषदेचे आयोजन बंदी घातलेल्या सीपीआयच्या माओवाद्यांनी केले होते असेही नमूद केले आहे.