मोशीत दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत पादचारी वृध्दा मृत्यू

0
606

मोशी, दि. ४ (पीसीबी) – पायी घरी निघालेल्या एका पादचारी वृध्दाला भरधाव वेघाने आलेल्या एका अज्ञात दुचाकी स्वाराने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार (दि.२) दुपारी तीनच्या सुमारास मोशी टोलनाक्याजवळील योगायोग बिल्डींग समोर घडली.

हरिबा आबाजी मुंढे (वय ८३, रा. गणपती मंदिराजवळ, शिवाजीवाडी, मोशी) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृध्द इसमाचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञात दुकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास हरिबा मुंढे हे मोशी टोलनाक्याजवळील योगायोग बिल्डींग समोरील रस्त्यावरुन पायी घरी निघाले होते. यावर भोसरीच्या दिशेकडून आलेल्या एका अज्ञात दुचाकीस्वाराने मुंढे यांना जोरदार धडक दिली आणि पसार झाला. या घटनेमध्ये मुंढे यांच्या डोक्याला जबर मारलागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. भोसरी एमआयडीसी पोलीस आरोपी दुचाकीस्वराचा शोध घेत आहेत.