एका रात्रित बजरंगने मिळविले २५ हजार डॉलर

0
349

पुणे, दि.२1 (पीसीबी) – ऑलिंपिकमध्ये कुस्ती प्रकारात पदकाच्या सर्वाधिक आशा असलेल्या बजरंग पुनियाने शनिवारी एका रात्रित २५ हजार डॉलर कमावले. पण, त्यासाठी त्याला सलग तीन लढती खेळाव्या लागल्या. अमेरिकेतील एका निमंत्रित स्पर्धेत खेळण्यासाठी बजरंगला विश्वकरंडक स्पर्धेला मुकावे लागले होते. या ८ जणांच्या चॅलेंज स्पर्धेत बजरंगने अंतिम फेरीत जागितक स्पर्धेतील दोन पदकविजेत्या जेम्स ग्रीन याला ८-४ असे पराभूत केले. बजरंगची प्रवेशिका भारतीय रेल्वे क्रीडा मंडळाकडून भरण्यात आली होती.

पहिल्या फेरीत ४-४ अशी बरोबरी झाली होती. सत्रात सुरवातीला बजरंगने दोन गुणांची आघाडी घेतली होती. त्यानंतर ग्रीनने पायाने आक्रमण करताना २-२ अशी बरोबरी साधली. त्यानंतर ग्रीनने आक्रमण कायम ठेवत २-४ अशी आघाडी घेतली. पहिले सत्रा संपताना मात्र पुनियाने ४-४ अशी बरोबरी राखली. दुसऱ्या फेरीत बजरंगने ग्रीनला फारशी संधी दिली नाही. बजरंगने ६-४ अशी आघाडी घेतली. लढत संपण्यास १५ सेकंद असताना बजरंगने वर्चस्व कायम राखताना आणखी दोन गुणांची कमाई करताना ८-४ असा विजय मिळविला. ग्रीनला अथक प्रयत्नांनंतरही बजरंगचा बचाव भेदता आला नाही.

बजरंगला स्पर्धेत पहिले मानांकन होते. बजरंगने अलिकडच्या काळात ६५ किलो वजन प्रकाराची निवड केली आहे. त्याच वेळी ग्रीन ७० किलो वजन प्रकारात खेळायचा. बजरंगने उपांत्यपूर्व फेरीत पॅट लुगो ायाच्यावर ६-१, तर उपांत्य फेरीत अॅन्थनी अॅशनॉल्ट याच्यावर एकतर्फी १०-० असा विजय मिळविला होता. स्पर्धेत तिसरा क्रमांक अॅलेक पॅंटालेओ याने मिळविला. त्याने अॅन्थनी अॅशनॉल्ट याच्यावर एकतर्फी लढतीत ८-१ असा विजय मिळविला.