“एका जागी बसण्याचा त्यांचा स्वभाव नाहीये; काही दिवसातच पुन्हा लढताना दिसतील”

0
276

मुंबई,दि.२५(पीसीबी) – राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना करोना झाल्याचं समजताच मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही एक ट्वीट करत शिंदे यांना लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

मंत्रीमंडळातील माझे लढवय्ये सहकारी मा. ना. श्री. एकनाथ शिंदे हे कोरोनाग्रस्त झाल्याचे कळले. एका जागी बसण्याचा त्यांचा स्वभाव नसल्याने मला खात्री आहे कि ते पुढील काही दिवसातच आपल्यामध्ये कोरोना विरुद्धची लढाई लढताना दिसतील. लवकर बरे व्हा हीच शुभेच्छा! असं जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विट मध्ये म्हणाले आहेत.