पूर्ववैमनस्यातून तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

0
334

थेरगाव,दि.२५(पीसीबी) – पूर्ववैमनस्यातून दोघांनी मिळून एका तरुणाला शिवीगाळ करत सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना बारणे कॉर्नर, थेरगाव येथे दिलखुश हॉटेल समोर गुरुवारी (दि. 24) सकाळी साडेदहा वाजता घडली.

करण अनिल सुकाळे (वय 19, रा. क्रांतिवीर नगर, बारणे चाळ, थेरगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आशिष पवार आणि त्याचा मित्र (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुकाळे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बारणे कॉर्नर येथील दिलखुश हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी पूर्ववैमनस्यातून फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

फिर्यादी सुकाळे आरोपींना जाब विचारण्यासाठी हॉटेलच्या बाहेर आले असता आरोपींनी सिमेंटच्या गट्टूने डोक्यात मारहाण करून त्यांना जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.