चाकण, निगडी, वाकड मधून तीन दुचाकी चोरीला

0
272

निगडी,दि.२५(पीसीबी) – चाकण, निगडी आणि वाकड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या. याबाबत गुरुवारी (दि. 24) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जयेश अशोक सोरटे (वय 27, रा. एकतानगर, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सोरटे यांची 70 हजार रुपये किमतीचे बुलेट (एम एच 14 / एच ई 4144) एकतानगर येथील नागराज गरेज समोर पार्क केलेली असताना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार 2 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ या कालावधीत घडली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

दिलीप धर्मदास गायकवाड (वय 55, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गायकवाड यांनी त्यांची आठ हजारांची दुचाकी (एम एच 14 / ए के 0208) ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे एका कार्यालयासमोर पार्क केली होती. 18 ते 26 ऑगस्ट या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी कार्यालयाच्या कंपाउंडच्या आतमधून दुचाकी चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

शंकर तुकाराम साबळे (वय 39, रा. ताथवडे, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी साबळे यांनी त्याची 25 हजारांची दुचाकी (एम एच 14 / जी एम 8373) 21 सप्टेंबर रोजी रात्री घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 22 सप्टेंबर रोजी उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.