पोलिसांना चोर घाबरत नाहीत…तळेगाव, चाकण, पिंपरी, दिघी मधून सहा दुचाकी चोरीला

0
573

चाकण,दि.२३(पीसीबी) – वाहन चोरीच्या घटना वाढत असून त्यात आणखी सहा दुचाकी वाहनांची भर पडली आहे. तळेगाव आणि चाकण मधून प्रत्येकी दोन तर पिंपरी आणि दिघी मधून प्रत्येकी एक दुचाकी चोरीला गेली आहे. याबाबत मंगळवारी (दि.22) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

कवर दिलीप सिंग (वय 37, रा. वनश्री नगर, तळेगाव दाभाडे) आणि लहू सोपान काकडे (वय 42, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोघांच्या दुचाकी त्यांच्या घराजवळून चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.

निझामुद्दीन मोमीन (वय 27, रा. बालाजीनगर, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची दुचाकी रुपेश संजय रजपूत (वय 21, रा. भगत वस्ती, मेदनकरवाडी, चाकण) या चोरट्याने चोरून नेली. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. चोरट्याने घराजवळून मोमीन यांची 20 हजारांची दुचाकी चोरून नेली होती.

संजय पंढरी पवार (वय 48, रा. मोशी) यांनी देखील चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 30 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्याने म्हाळुंगे येथील ऑटोकॉमपानसेपी व्ही टी लिमिटेड या कंपनीच्या पार्किंगमधून चोरून नेली आहे.

प्रदीप सुदाम चव्हाण (वय 38, रा. तापकीरनगर, काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 30 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्याने पिंपरी येथील एका सार्वजनिक रोडवरून चोरून नेली आहे.

संतोष गोविंद कदम (वय 35, रा. डुडुळगाव) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 30 हजारांची दुचाकी त्यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.