उल्लेखनीय कामगिरी करणा-यांचा ‘ बाळासाहेब ठाकरे गौरव ‘ पुरस्काराने सन्मान

0
199

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना सांगवी विभागाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या मान्यवरांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते ‘बाळासाहेब ठाकरे गौरव ‘ पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. बाळासाहेबांच्या नावाने त्यांच्या जन्मदिनानिमित्त सन्मान होत आहे. हा सन्मान नक्कीच पुरस्कार्थींना त्यांच्या कार्यामध्ये प्रेरणादायी ठरेल, असे खासदार बारणे म्हणाले.

सांगवी येथे झालेल्या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, उपशहरप्रमुख विजय साने, सिकंदर पोंगडे, चेतन शिंदे, मंगला भोकरे, स्वरूपा खापेकर आदी उपस्थित होते. कराटेपट्टू सुधीर गडलिंग (उत्कृष्ट क्रीडा संघटक), अनिल लोखंडे (गुणवंत शिक्षक), भारती परदेशी (शैक्षणिक क्षेत्र), प्रिती माने (शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट संघटक), कविता अल्हाट (क्रीडा), गणेश कांबळे (पत्रकार), सुधा खोले (उत्कृष्ट क्रीडारत्न), डॉ. जयश्री घेगडे (उत्कृष्ट दंत चिकित्सक), प्रिती परदेशी (शैक्षणिक क्षेत्र), गणेश सिंन्हा (जीवन गौरव-कराटे), डॉ. रमेश सोनवणे (एमडी) (आरोग्य विभाग गुणगौरव), ह.भ.प बाळासाहेब शितोळे (धार्मिक गुणगौरव), कृष्णकांत ढाणे (आदर्श शिक्षक), नंदकिशोर ढोरे (उत्कृष्ट वादक), रंगनाथ उंडे (पोलीस क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी), विजया आंबेडकर (आरोग्य विभाग गुणगौरव), विद्या भागवत (उद्योजक क्षेत्रात गुणगौरव) आणि आदेश ढोरे उत्कृष्ट शरीरसौष्ठवकर्ता यांचा ‘बाळासाहेब ठाकरे गौरव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

खासदार बारणे म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-यांना ‘बाळासाहेब ठाकरे गौरव’ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. बाळासाहेब यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय हा पुरस्कार्थी म्हणून तुमचा आणि हा पुरस्कार प्रदान करता येत आहे म्हणून माझा मोठा सन्मान आहे. बाळासाहेबांनी आपले आयुष्य हिंदुत्व आणि समाजासाठी खर्ची केली. विचारापासून कधी तडजोड केली नाही. खेळाडू, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणा-यांना बाळासाहेबांनी नेहमीच पाठिंबा दिला. आर्थिक मदत केली. अध्यात्मिक, सांप्रादाय क्षेत्रातही बाळासाहेब यांचे मोठे योगदान आहे. पत्रकारितेच्या माध्यमातूनही त्यांनी समाजावर अंकुश ठेवण्याचे काम केले. बाळासाहेबांच्या नावाने त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपला सन्मान होत आहे. हा सन्मान नक्कीच तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये प्रेरणादायी ठरेल ”. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साने यांनी केले तर चेतन शिंदे यांनी आभार मानले