पुणे महापालिकेच्या ड्रेनेज विभागात कोट्यवधींचा घोटाळा

0
282

पुणे,दि.२५(पीसीबी) – मलनिस्सारण प्रकल्प विभाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता संदीप खांदवे हे 31 ऑगस्ट 2019 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा पदभार कार्यकारी अभियंता सुष्मिता शिर्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून देण्यात आला. त्यानंतर सुमारे 3 महिन्यानंतर 27 नोव्हेंबर 2019 रोजी काही अधिकाऱ्यांनी संगनमताने खांदवे यांची बनावट स्वाक्षरी करून पाटील कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला 4 कोटी 88 लाख 24 हजार 505 रुपयांचे बिल परस्पर अदा केले, असा आरोप आहे.

मलनिस्सारण प्रकल्प विभागाने संबंधित ठेकेदाराला शहरात ठिकठिकाणी मलवाहिण्या टाकण्याचे एकूण 56 कोटी 57 लाखाचे कंत्राट 2017 साली दिलेले आहे. त्यानुसार शहरातील सुमारे 51 किलोमीटर लांबीच्या नदीनाल्यांमध्ये 36 ठिकाणचे मैलापाणी बंदिस्त नलिकांद्वारे जवळच्या मैलापाणी शुद्धीकरण केंद्रापर्यंत वाहून नेहण्यात येणार आहे. या कांत्राटतील, बारावे बिल काढताना हा मोठा घोटाळा झाला. याबाबत बोलताना ‘त्या बिलावर मी सही केलेली नाही. महापालिकेच्या प्रदीर्घ सेवेत मी अत्यंत जबाबदारी काम केले आहे. सेवानिवृत्तीनंतर तर अशी सही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही