उपेंद्र कुशवाह महाआघाडीत सामील; अहमद पटेलांची घोषणा

0
572

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – एनडीएला सोडचिठ्ठी देऊन केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले
राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी आपण महाआघाडीमध्ये सहभागी होत असल्याचे महत्त्वाच्या नेत्यांसमोर जाहीर केले.  त्याचबरोबर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी याबाबत औपचारीक घोषणा केली आहे.  

पाच राज्यांतील निवडणूक निकालाच्या आधी एनडीएनने घेतलेल्या घटक पक्षांची महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होण्यास उपेंद्र कुशवाहा यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर कुशवाह यांच्या बद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर कुशवाह यांनी विरोधकांच्या महाआघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

उपेंद्र कुशवाह महाआघाडीत सहभागी  झाल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपने महाआघाडीवर  हल्लाबोल केला आहे. महाआघाडीचा अर्थ भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पंक्षांनी यावे, असा होत नाही, असे भाजपने म्हटले आहे.