उध्दव ठाकरे, मुख्यमंत्र्यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; युतीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार  

0
614

कोल्हापूर, दि. २४ (पीसीबी) – शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचे रणशिंग आज (रविवार)  कोल्हापूरमधून फुंकले जाणार आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तपोवन मैदानावर जंगी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेसाठी पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यातील दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी युतीचे जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यांनी  अंबाबाईचे दर्शन घेतले आहे.

हे दोघे हॉटेल सयाजी येथे जाणार असून तिथे त्यांच्यात चर्चा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे सभास्थानी पोहोचतील. या सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंसह महायुतीचे सर्व नेते उपस्थित असणार आहेत.

भंडारा गोंदियातून सुनील मेंढे, माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर तसेच साताऱ्यातून नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा या सभेत होणार आहे. सभेनंतर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरी जाणार आहेत.