काँग्रेसची सुरेश धानोरकरांना उमेदवारी; चंद्रपुरात उमेदवारी बदलण्याची नामुष्की

0
593

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची नववी यादी आज (रविवार) जाहीर केली आहे. या यादीत बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीरमधील १० उमेदवारांचा समावेश आहे.  महाराष्ट्रातील चार उमेदवारांचा या यादीत समावेश आहे.

चंद्रपुरातून विनायक बांगडे यांच्याऐवजी सुरेश धानोरकरांना उमेदवारी  देण्यात आली आहे. रामटेकमधून किशोर गजभिये, हिंगोलीतून सुभाष वानखेडे, अकोल्यातून हिदायत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या यादीत चंद्रपुरातून सुरेश धानोरकर, रामटेकमधून किशोर गजभिये, हिंगोलीतून सुभाष वानखेडे, अकोल्यातून हिदायत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रपूर येथे विनायक बांगडे यांना जाहीर केलेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तर सुरेश (बाळू) धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.