मोदी शरद पवारांची भेट का घेतात ? – प्रकाश आंबेडकर  

0
371

 उस्मानाबाद, दि. २४ (पीसीबी) – पंतप्रधान  नरेंद्र मोदी वारंवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटी  का घेतात ?  मागील पाच वर्षांत किमान पाचवेळा त्यांनी व्यक्तीगत पातळीवर पवार यांची भेट घेतली आहे,  असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी  म्हटले आहे. 

उस्मानाबाद येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी  आंबेडकर आले होते. यावेळी ते पत्रकारांशी  बोलत होते.   ते म्हणाले की, मोदी आमच्याकडे चहा घ्यायला आले, तर आम्हीही त्यांचे स्वागतच करू.  मात्र, पवार आणि त्यांच्या भेटीमध्ये काय गौडबंगाल आहे ? याचे उत्तर मोदी आणि पवारांनी द्यायला हवे, असे ते म्हणाले.

आपली लढत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी नसून  भाजपशी आहे. या लढतीत काँग्रेस-राष्ट्रवादी तिसऱ्या  क्रमांकावर जाईल. त्यामुळे  जनतेबरोबर  व्यापाऱ्यांनीही   वंचित आघाडीला पाठिंबा द्यावा,  असे आवाहन त्यांनी केले.