‘इव्हीएम’ वरच फेरमतमोजणी; केवळ मतदानाच्या खात्रीसाठी व्हीव्हीपीएटीवरील चिठ्ठ्या   

0
380

पुणे, दि. ७ (पीसीबी) – काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या  (इव्हीएम) पारदर्शकतेवर शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाची प्रक्रिया ही ‘व्होटर व्हेरिफायड पेपर ऑडिट ट्रायल’ (व्हीव्हीपीएटी) या प्रणालींद्वारे होणार  आहे. मात्र,  फेरमतमोजणीचा प्रसंग उद्‌भवल्यास  ‘इव्हीएम’मशीनवरून मतांची फेरमोजणी करण्यात येणार आहे.

‘व्हीव्हीपीएटी’ प्रणालीमध्ये मतदारांना  मिळणारी चिठ्ठी ही केवळ पसंतीच्या उमेदवाराला मत मिळाले की नाही,  याची मतदारांना खातरजमा करण्यासाठी दिली जाणार आहे.   फेरमतमोजणीची वेळ आल्यास चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार   नाही.