इंद्रायणीनगर, सेक्टर १ मधील फुटपाथच्या कामांना सुरूवात; सीमा सावळे, सारंग कामतेकर, समर कामतेकर यांचा पाठपुरावा

0
1018

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – इंद्रायणीनगर, सेक्टर क्रमांक १ मधील महाराष्ट्र कॉलनी, हवेली हॉटेल तसेच सिध्दीविनायक मंदिर या परिसरातील फुटपाथच्या कामांना सुरूवात करण्यात आली आहे. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सीमा सावळे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि युवा नेते समर कामतेकर यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे मार्गी लागली आहेत.

इंद्रायणीनगर, सेक्टर क्रमांक १ मधील महाराष्ट्र कॉलनी, हवेली हॉटेल तसेच सिध्दीविनायक मंदिर या परिसरातील फुटपाथांची दुरवस्था झाली होती. फुटपाथवरून नागरिकांना चालणेही मुश्किल झाले होते. फुटपाथांची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत होती.

ही बाब लक्षात घेऊन स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापालिका प्रशासनाला या परिसरातील फुटपाथ करण्याबाबत सूचना केल्या होत्या.  तसेच या कामांसाठी लागणाऱ्या  आवश्यक निधीची तरतूद करून घेतली होती. हा निधी मंजूर झाल्यानंतर फुटपाथच्या कामांना सुरूवात करण्यात आली आहे

या कामांसाठी भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आणि युवा नेते समर कामतेकर यांनीही   महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू  केला होता. आता या कामांना सुरूवात झाल्याने स्थानिक नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.