संसद परिसरात कार घुसली; सुरक्षा यंत्रणेची तारांबळ  

0
721

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – संसद परिसरात एक संशयित कार आज (मंगळवार) अचनाकपणे घुसली. या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणेची एकच तारांबळ उडाली. कार दुभाजकाला धडकल्याने मोठ्याने आवाज झाला. या आवाजामुळे सुरक्षा रक्षकांनी पळापळ झाली आणि गोंधळ उडाला.

सुरक्षा रक्षकांनी कार अडवून चौकशी केली असता ही कार एका खासदाराची असल्याचे आढळून आली. कारचा बूमला चुकून स्पर्श झाला आणि सुरक्षा यंत्रणेचा अलार्म वाजला.  त्यामुळे  गाडीचे एअर बॅगही उघडले. यामुळे सुरक्षा रक्षक सतर्क झाले.

ही कार चुकीच्या प्रवेशद्वारातून संसद परिसरात घुसली, तसेच कार दुभाजकाला धडकल्याने चालक किरकोळ जखमी झाला. त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, २००१मध्ये झालेल्या हल्ल्यावेळी दहशतवादी याच गेटने संसद परिसरात घुसले होते.  आजच्या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.