इंदोरीकर महाराजांचे काम विसरून चालणार नाही – अभिजीत पानसे

0
257

अहमदनगर, दि. ११ (पीसीबी) : मनसे नेते अभिजीत पानसे यांनी इंदोरीकर महाराजांची भेट घेतली. समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदोरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला सुरु असताना, आज मनसे नेत्याने भेट घेऊन, इंदोरीकर महाराजांशी चर्चा केली.संगमनेर तालुक्यातील ओझर या गावी अभिजीत पानसे आणि इंदोरीकर महाराज यांची भेट झाली. इंदोरीकर महाराजांच्या निवास्थानी दोघांमध्ये चर्चा झाली. या दोघांनी बंद दाराआड अर्धातास चर्चा केली. इंदोरीकर गुन्हा दाखल झाल्यावर ही प्रथमच भेट आहे. मनसे इंदोरीकरांच्या पाठिशी असल्याचं यावरुन स्पष्ट होत आहे.

या भेटीनंतर अभिजीत पानसे म्हणाले, “एखाद्या छोट्या, अनावधाने केलेल्या वाक्यावरुन इतकी टोकाची भूमिका चुकीची आहे. त्यांनी माफीही मागितली आहे. इंदोरीकर महाराजांचे कार्य सुद्धा महत्वाचे. शाळा चालवत आहेत, समाज प्रबोधनाचं मोठं काम विसरुन चालणार का? पक्ष, राजकारण यापलिकडे आपण पाहायला हवं” आज सदिच्छा भेट घेतली असून सरकारने याबाबत काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे, असं अभिजीत पानसे म्हणाले.