आळंदीत महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार; व्हिडिओ शुटींग करुन केले ब्लॅकमेल

0
582

आळंदी, दि. २२ (पीसीबी) – गुंगीचे औषध देऊन एका २४ वर्षीय महिलेवर एकाने बलात्कार केला. या सर्व प्रकाराचे दुसऱ्याने व्हिडिओ शुटींग केले आणि ते लोकांना दाखवण्याची धमकी देत त्याने सुध्दा या महिलेला ब्लॅकमेल करुन वेळोवेळी अत्याचार केला. ही घटना फेब्रुवारी २०१६ ते सप्टेंबर २०१८ दरम्यान आरोपीच्या दुकानात आणि आळंदी येथील लॉजवर घडली.

याप्रकरणी पिडित २४ वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नितीन रामजी ठक्कर आणि त्याचा साथीदार लालु उर्फ हेमंत चौदामासा (दोघे. रा. भाटनगर, पिंपरी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन ठक्कर याने फेब्रुवारी २०१६ ते सप्टेंबर २०१८ दरम्यान पिडित महिलेला कोल्ड्रींक मधुन गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्याने महिलेवर बलात्कार केला. हे सर्व लालु याने त्यांच्या मोबाईलमध्ये शुट केले. त्याने देखील या महिलेला तो व्हिडिओ लोकांना दाखवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले आणि वेळोवेळी अत्याचार केला. या दोघांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक साळुंखे तपास करत आहेत.