आम्ही चोरी केल्याच्या बातम्या पोलिसांना का देतो असे म्हणत तरुणावर कोयत्याने वार

0
257

पिंपरी दि. २० (पीसीबी) -आम्ही केलेल्या चोरीच्या बातम्या पोलिसांना का दिल्या, असे म्हणत दोघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री साडेनऊ वाजता मिलंद नगर, पिंपरी येथे घडली.

अजय जालिंदरसिंग टाक (रा. मिलिंदनगर, पिंपरी), रितिक राजेंद्र पारचा (रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सागर ज्ञानदेव ढावरे (वय 19, रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तू आम्ही केलेल्या चोरीच्या बातम्या पोलिसांना का दिल्या’ असे म्हणत आरोपींनी फिर्यादी यांना कोयत्याने डोक्यात, हाताच्या बोटावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या पाठीवर आणि खांद्यावर उलट्या कोयत्याने मारून शिवीगाळ करत ‘तुला आता सोडणार नाही’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.