धुळवडीच्या दिवशी हत्याकांड ! दारु पिऊन पडून नव्हे, तर डोक्यात वीट घालून हत्या

0
241

कुंदनमल धुळवडीच्या दिवशी दुपारी 3 च्या सुमारास धोबीघाट परिसरातून चालत जात होता. यावेळी दारूच्या नशेत त्याचा तोल जाऊन तो पडला आणि त्यात डोक्याला दुखापत झाल्यानं त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

उल्हासनगर दि. २० (पीसीबी) : धुळवडीच्या दिवशी उल्हासनगरमध्ये आठ ते दहा जाणांकडून तीन तरुणांना मारहाण झाल्याचा प्रकार ताजा असतानाचा आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमध्ये धुळवडीच्या दिवशीच एकाची वीट डोक्यात घालून हत्या करण्यात आली आहे.
या प्रकारानं पुन्हा एकदा उल्हासनगर हादरुन गेलं आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांच्या आतच दोघा मारेकऱ्यांपैकी एकास अटक केली आहे.

तर दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकंही तैनात केली आहे. लवकरच दुसराही मारेकरी पोलिसांच्या हाती लागेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. किरकोळ कारणावरुन दोघांनी एका इसमाला मारहाण केली. या मारहाणीत इसमाच्या डोक्यात सिमेंटच्या विटेनं प्रहार करण्यात आला. यात इसमाच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं त्यातच त्याचा मृत्यू झाला.

सुरुवातीला या इसमाचा मृत्यू भलत्याच कोणत्यातरी कारणामुळे झाला असावा, असं तक्रारीत म्हटलं होतं. मात्र पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आपली तपास यंत्रणा कामाला लावली. त्यातून या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.