पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश सर तुमचे डोळे का डबडबले…?

0
240

 पिंपरी दि. २० (पीसीबी) -दृष्टिहीनांना मार्ग दाखविणारे अनेक जण समाजात आज कार्यरत आहेत. नेत्रदान,अंध शिक्षण,प्रशिक्षण व रोजगाराच्या माध्यमातून कसेबसे कार्य सुरु आहे.त्यांच्या संवेदना जाणणाऱ्या कृष्ण प्रकाश सरांनी धूलिवंदन निमित्त विषेश कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यांना रंगांची ओळख नाही याची जाणीव असल्याने त्यांनी माणुसकीचे रंग त्यांना लावता यावेत असे नियोजन केले होते.ज्या डोळ्यांनी कधी रंग पाहिले नाहीत त्यांचे अनुभव कानावर पडताच सर आपले डोळे का पानवाले का डबडबले….?

सप्तरंगांची उधळण करीत धूलिवंदन आपण मोठ्या जल्लोशात साजरी करत असतो.रंगांची ओळख असायला दृष्टि ही हवीच. यासाठी डोळे महत्वाची भूमिका बजावतात.आपण धावपाळीच्या या युगात डोळ्यांची खरच काळजी घेतो का.?समाजातील अस्थिरतेचे रंग आपण ओळखू शकतो का ?

हा प्रत्येकाच्या विचारांचा भाग आहे.डोळ्यात दाटलेल्या काळोखाला कोणता रंग असतो ? याच उत्तर डोळस व्यक्ति देऊ शकतात.मात्र ज्या डोळ्यांना रंगाचा कधी स्पर्श झाला नाही ते काय सांगणार? अशा दृष्टिहीन व्यक्ति समाजाच्या सहकार्यातुन व प्रेमाच्या शब्दातुन आपुलकीचे रंग ओळखत असतात.एक क्षण विसावा घ्या आणि डोळे बंद करून जगण्याचा विचार करून पहा.मनात भितीच्या उंच उंच लाटा उभ्या राहतील हे नक्की.ज्यांच्या नशिबी असा काळोख आहे ते आपल्या आयुष्यात कसे रंग भरत असतील?

या गोष्टी येथे मांडताना समाजाने दृष्टिहीन व्यक्तिना सहानभुती नाही तर सहकार्य करण्याची गरज आहे हे मला नमूद करायचे आहे.काल सर्वत्र धूलिवंदन मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली.विविध रंगांची उधळण करीत आपण या उस्तवात न्हावुन निघालो.पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात आपण दृष्टिहीन व्यक्तिना बरोबर घेऊन रंगांची उधळण करावी ही कल्पना आयुक्त कृष्ण प्रकाश सरांच्या मनात आली.काही क्षणातच हा आनंद सोहळा दृष्टिहीन व्यक्ति बरोबर करण्याचे नियोजन झाले.सुरुवातीला तासभर गाण्यांची मैफिल रंगली.दृष्टिहीन मित्र-मैत्रीणीनी आपल्या सुरेल आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.या मैफिलित खाकी वर्दी सुद्धा सहभागी झाली.काही वर्दितील गायकांनी मनमोकळा आंनद लुटला. कृष्ण प्रकाश सरांचे आगमन झाले.त्यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत दृष्टिहीन बांधवांच्या व्यथा,वेदना व गरजा यावर शब्दातुन रंग टाकले.आपण डोळस समाजाने डोळ्याची काळजी कशी घ्यावी व त्याचा आनंद कसा घ्यावा हे मांडताना पर्यावरण पुरक रंग व धुलवड कशी साजरी करावी या बाबत मत मांडले.कार्यक्रमासाठी संवेदनशील पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.शहरात दृष्टिहीन व्यक्तिना बरोबर घेऊन हा कार्यक्रम असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर उस्ताह होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी माझ्यावर होती.मात्र आता पुढे काय करायचं हा प्रश्न माझ्या पुढे होता.थोडासा विचार केला आणि थोड़ी हिम्मत वाढवत कृष्ण प्रकाश सरांना दृष्टिहीन मित्रांना रंग लावण्याची विनंती केली.समाजात मिसळून एकरूप होण ही ओळख असणाऱ्या या वर्दितिल माणसाने आपले हात रंगात टाकले आणि दृष्टिहीन मित्रांच्या गलावर ठेवत रंगांची ओळख दिली.उपस्थित सर्वांना कुतूहल वाटले हे नक्की.

अंगावर खाकी वर्दी असलेल्या या आयर्नमॅन चा स्पर्श दृष्टिहीन व्यक्ति अगदी चाहुल घेऊन अनुभवत होते.याच वेळी संतोष राऊत हा दृष्टिहीन विद्यार्थी पुढे सरसावला हातला रंगाने भरलेला स्पर्श समजला त्याने रंग हातात घेत कृष्ण प्रकाश यांचा शोध घेतला.चाचपडणाऱ्या हाताला पाहुन सर पुढे सरसावले.चेहरा समोर येताच संतोष याने माणुसकीचा चा रंग चेहऱ्यावर लावला.खाकी वर्दीवरही पडलाच.आणि खाकी वर्दी खऱ्या अर्थाने सप्तरंगी झाली.त्यांच्या चेहऱ्यावर लागलेला रंग पाहुन उपस्थितांचे चेहरे प्रफुल्लित झालेले मी पाहिले.ही रंगांची उधळण हळूहळू वाढत गेली.पाहता पहाता आयुक्तालय रंगानी न्हाऊन निघालं.सामाजिक जाणीवेतून उधरळलेले हे रंग सर्वांनाच आनंद देत होते.

याच प्रसंगी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले संवेदनशील पत्रकार मित्र पुढे ससरसावले.न्यूज 18 लोकमत चे पत्रकार गोविंद वाकडे यांनी दृष्टिहीन मित्र संदीप भालेराव यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला.शेजारी आयर्न मॅन उभे होते याची पुसटशीही कल्पना भालेराव यांना न्हवती.आपण आजच्या या कार्यक्रमा बद्दल काय संगाल हे विचारताच.भालेराव काहीतरी शब्द पुटपुटले त्यांचा उर भरून आला होता.भावुक झाले होते.उत्तर देण्याआधी त्यांचा बांध फुटला बंद डोळ्यांतुन आनंदाश्रु येऊ लागले.

शाहराच्या पोलीस आयुक्तांनी आमच्या समवेत हा कार्यक्रम घेतला या बद्दल आभार मानले.आम्ही कधीही रंग ओळखू शकत नाही मात्र माणूसकीचा व सहाकार्याचा रंग कृष्ण प्रकाश सरांनी लावला असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रसंगी माझी आणि हळव्या मनाच्या कृष्ण प्रकाश सरांची नजर एक मेकांकडे गेली.सरांचे पाणवलेले डोळे सर्वकाही सांगत होते. मनसुन्न करणारे शब्द कानावर पडत होते.या प्रसंगी खाकी ओली कशी होऊ शकते हे मला जाणवल.शांतता होतीच आसपास असणाऱ्या अनेकांनी हे क्षण नक्कीच साठवण करून ठेवले असतील हे नक्की. भालेराव यांच्या खांद्यावर हात ठेवत स्वतःला सावरताना ही माणुसकीची खाकी आज सर्वांनी अनुभवली.बहुतांशी पत्रकार मित्रांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिति लावली होती.कार्यक्रमात उपस्थितांचे चेहरे माणुसाकीच्या रंगांनी सजले होते.त्यांनी सरांना व दृष्टिहीन व्यक्तिना बोलते केले.दृष्टिहीन गायकांनी गायलेल्या गण्यांची तारीफ करायला सर विसरले नाहीत.आपला आवाज छान आहे हे शब्द कानावर पडताच त्यांचे चेहरे स्पतरंगांनी फुलले होते.हाताची घडी करत आपल्याच स्टाईल मध्ये सर उभे राहिले आणि रंगलेले सर्वच चेहरे त्यांच्या सहववासात एकरूप झाले.आठवणीत राहणाऱ्या या प्रसंगाला सर्वच पत्रकारांनी बातमीतुन स्थान दिले.उपस्थितांना फोटोचा मोह आवरणे अशक्य होते सर रंगानी सजलेल्या चेहऱ्यामध्ये हरवून गेले होते.
माझ्या पिंपरी-चिंचवड शहरात अशा स्वरूपाचे कार्यक्रम होतात.याचा प्रत्येकाला अभिमान वाटेल हे नक्की…….