आमदार प्रताप पाटील चिखलीकर शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणार ?

0
2808

मुंबई, दि. २० (पीसीबी) – शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर  यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या भाजपच्या बैठकीला  हजेरी लावली. त्यामुळे चिखलीकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्ष यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नुकतीच पार पडली. यावेळी  शिवसेनेचे लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव चिखलीकर उपस्थित होते.

यावेळी लोहा नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळण्यात चिखलीकर यांची मोठी भूमिका आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी चिखलीकरांचे कौतुक केले.  नांदेड महापालिकेत भाजपला मदत केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनीही चिखलीकरांचे आभारही मानले होते .त्यापासून चिखलीकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.