आमदार कपिल पाटलांच्या पत्रामुळे राज्यातील महाआघाडीत बिघाड?

0
1847

मुंबई, दि. २५ (पीसीबी) –  राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या  महाआघाडीत बिघाड होण्याची  चिन्हे दिसू लागली आहे. लोकतांत्रिक जनता दलाचे आमदार कपिल पाटील यांनीही महाआघाडीविषयीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या संदर्भात कपिल पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पत्र लिहिले आहे.   या पत्रात त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय महाराष्ट्रात महाआघाडीला पूर्ण स्वरुप येऊ शकत नाही. आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना एक-एक जागा सोडली आणि अन्य पक्षांना विधानसभेच्या जागा सोडण्याचे आश्वासन दिले की आघाडी झाली, असे आपण मानत असाल तर वास्तवापासून आपण खूप दूर आहोत, असे पाटील यांनी पत्रात  म्हटले आहे.

देशातील आणि महाराष्ट्रातील स्थितीमधे काही एक अंतर आहे. महाराष्ट्रात योगी किंवा खट्टर सरकार नाही. मराठा आरक्षण जाहीर झाले आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करुन टाकला आहे. हिवाळी अधिवेशनात ना सरकारला थंडी वाजली ना विरोधी पक्षांची धग जाणवली. राज्यात १९७२ पेक्षा तीव्र दुष्काळ आहे. आताच पाणी टंचाई आहे. पुढचे सात महिने काढायचे आहेत. शेतकरी परेशान आहे. पण दुष्काळाच्या प्रश्नावर सभागृहात ना साधक बाधक चर्चा झाली. ना सरकारला घेरता आले, असेही  पाटील यांनी म्हटले आहे.