मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री माझ्या संपर्कात होते; मिशेलचा पत्रातून गौप्यस्फोट

0
627

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा एक मोठा गट ऑगस्टा वेस्टलॅंड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारातील दलाल ख्रिश्चिअन मिशेल  याच्या संपर्कात होते. त्याचबरोबर युपीए सरकारच्या संवेदनशील बैठकांची इत्यंभूत माहिती त्याला पुरवली जात होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट मिशेल याच्या एका पत्रात करण्यात आला आहे.

२८ ऑगस्ट २००९ रोजी मिशेलने ऑगस्ट वेस्टलँडचे मालक जी. ओरसी यांना एक पत्र लिहीले होते. या पत्रामध्ये त्याने दावा केला होता की, त्याला अमेरिकेचे तत्कालीन सेक्रेटरीज ऑफ स्टेट हिलरी क्लिंटन आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामध्ये झालेल्या गोपनीय चर्चेचा तपशील मिळत होता. मिशेलने आपल्या पत्रात या गोष्टीचाही पर्दाफाश केला होता की, तत्कालीन सरकारमधील अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्री यांच्यामध्ये पावर-स्ट्रगल सुरु होता.

मिशेलने आपल्या पत्रात २००९ मध्ये १९ ते २३ जुलैदरम्यान हिलरी क्लिंटन आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामध्ये झालेल्या बैठकींचा उल्लेख केला आहे. त्याने आपल्या पत्रात हिलरी क्लिंटन यांनी मनमोहन सिंग यांना काय म्हणाल्या याचा उल्लेख केला आहे. मिशेलने लिहीले होते की, मनमोहन सिंग काही अज्ञात कारणांमुळे अमेरिकेशी चांगले संबंध कायम ठेवण्याचे प्रयत्न करीत होते. या खरेदी प्रक्रियेतील मनमोहन सिंग यांच्या कार्यप्रणालीवरही त्याने टीका केली आहे. तर तत्कालीन संरक्षणमंत्र्यांना त्याने घमेंडी संबोधले आहे.