आता पाटलांच्या पोरींनीही नाचलं पाहिजे, हवं तर मी त्यांना लावणी शिकवतो – लक्ष्मण माने

0
2499

पुणे, दि. ९ (पीसीबी) – पाटलांनी आता लावणीच्या कार्यक्रमाला जाऊन फेटा उडवण्यापेक्षा त्यांची एखादी चांगली पोरगी आमच्याकडे पाठवावी, तिला मी लावणी शिकवतो, त्यांच्याही पोरींनी आता नाचले पाहिजे, असे   माजी आमदार लक्ष्मण माने यांनी म्हटले आहे.  

पुण्यात ओबीसी आरक्षण जागरण परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी  बोलताना माने म्हणाले की, आमच्याच पोरींनी किती दिवस नाचायच ? तुमच्यातील एखादी पोरगी माझ्याकडे पाठवा, तिला मी लावणी शिकवतो. आम्हीच काय नाचायचा ठेका घेतला आहे का ? असा सवाल  माने यांनी केला. आता आमची लोक बॅंड वाजवणार नाहीत, पाटलांचे बॅंड असले पाहिजेत. आता तुम्ही फेटे उडवू नका. तुम्ही बॅंड वाजवा, असेही माने म्हणाले.

सत्तर वर्षे त्यानी खूप खाल्ले आहे. आता आम्ही सत्ता मिळवणार आहोत. आम्ही आता कोणाला काही मागणार नाही. मागणाऱ्याच्या रांगेत आम्ही नसणार आहोत.आम्हीच आमची सत्ता निर्माण करू,  असा निर्धार माने यांनी यावेळी व्यक्त केला.