आजीबाईंना शंका आली अनं….! मोटारीवर कव्हर, आत प्रेमीयुगूलाचे चाळे

0
1090

पुणे, दि.२० (पीसीबी) –  आजची तरुण पिढी प्रेमासाठी काय करेल काही सांगता येत नाही. पुण्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. चारचाकी गाडीवर कव्हर टाकून गाडीत अश्लिल चाळे करणाऱ्या एक प्रेमी युगुल बिंग एका आजीबाईंनी फोडलं. 

परमहंसनगरजवळ मिलिट्री गेटजवळ एका गाडीवर कव्हर टाकले होते. गाडीत चालू असलेल्या एसीचा आवाज आजींनी ऐकला आणि प्रेमींचं बिंग फुटलं. एसीचा आवाज ऐकून जवळच्या आजीबाईंना शंका आली की गाडीत कोणी अडकलं की काय…? म्हणून त्यांनी गाडीमालकाबाबत चौकशी केली. सोसायटीच्या अध्यक्ष आसपासच्या रहिवाश्यांकडे आजींनी चौकशी केली.

आपल्याकडे कोणाही पाहुणे आले नाहीत, सगळ्या रहिवाश्यांनी सांगितलं. नंतर शंका आली ती गाडीत चुकून एसी चालू राहिला असेल याची. सोसायटीच्या अध्यक्षांनी गाडीवरील कव्हर हटवताच समोर आलेलं सत्य पाहून सर्वजण चांगलेच आचंबित झाले. गाडीत एक प्रमी युगुल अश्लिल चाळे करताना त्यांना दिसले.

संबंधित प्रेमी युगुलाला रहिवाश्यांनी फटकारलं आणि तिथून हाकलून लावलं. याबाबत रहिवाश्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही. मात्र पोलिसांनी अशा घटनांवर लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी परिसरातील रहिवाश्यांची अपेक्षा आहे.

परमहंसनगरजवळील रस्ता मोठा असल्याने त्या भागात पार्किंगचे प्रमाण वाढले आहे. पार्क केलेल्या गाड्यांचा आमच्याशी काहीही संबंध नाही. त्यांना पार्किंगपासून कसं रोखावं हा प्रश्न आता आम्हाला पडला आहे,  सोसायटीतील लोकांचं म्हणणं आहे.