आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत राजमाता जिजाऊ महाविद्यालयाला विजेतेपद

0
727

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – एन.व्ही.एन महाविद्यालय लोणावळा येथे आयोजित केलेल्या पुणे जिल्हा क्रीडा विभागाअंतर्गत आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत भोसरीतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे  कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला प्रथम विजेतेपद मिळाले.

या स्पर्धेत महाविद्यालयाने परदंवाडी येथील इंदिरा महाविद्यालयाचा २-० अशा सेटनी  पराभव करून उपांत्य सामन्यात मजल मारली. त्यानंतर उपांत्य फेरीच्या सामन्यात  सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाचा ३-० अशा सेटनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

अंतिम फेरीत बारामतीच्या टी.सी.महाविद्यालयाचा ३-१ अशा सेटनी पराभव करून प्रथम विजेतेपद पटकावले. या सामन्यात प्रशांत सागर, सद्दाम मुलाणी, कार्तिक खेडकर, अनिस सय्यद, प्रसाद कुंभार,  सौरभ दाभाडे, सनी भोसले, सौरभ भोसले, शुभम पठारे, रोहन दाभाडे, सौरभ कोतवाल, अतिश पठारे, या खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले. यांना महाविद्यालयाचे शारीरिक  शिक्षण संचालक प्रा. गणेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विलास लांडे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.  तसेच संस्थेचे सचिव विश्वनाथ कोरडे, खजिनदार, अजित गव्हाणे, विश्वस्त  प्रतापराव खिरीड, प्राचार्य डॉ. गौतम भोंग, उपप्राचार्य डी.बी.पवार, रजिस्टार अश्विनी भोसले-चव्हाण,  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.