‘मालेगाव बॉम्बस्फोट’ प्रकरण ; साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांच्यावर आरोपनिश्चिती

0
485

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – ‘मालेगाव बॉम्बस्फोट’  प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, मेजर उपाध्याय यांच्यासह ७ आरोपींवर दहशतवादी कट व हत्येचा ठपका ठेवण्यात आला आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने  आज (मंगळवार)  आरोप निश्चित केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ ऑक्टोबर रोजी होणार  आहे.