‘अहो चिऊ ताई, प्रवीणने प्रमोद को क्यों मारा?’ राष्ट्रवादीचा पूनम महाजनांना खोचक सवाल

0
1295

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – ‘अहो चिऊ ताई, देश की जनता यह जानना चाहती है ?, प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा?’, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप खासदार पूनम महाजन यांना केला आहे.  मुंबईत ठिकठिकाणी  पोस्टर लावून महाजन यांना हा सवाल केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख शकुनी मामा असा करणाऱ्या महाजन यांना राष्ट्रवादीने पलटवार केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर पूनम यांच्यावर टोला लगावला आहे.   ‘पूनमताई महाजन… स्व. प्रमोद महाजन आणि शरद पवार यांचे मैत्रीचे संबंध आपण कसे काय विसरलात ? राजकारणातील प्रसिद्धीसाठी आपण शरद पवारांबद्दल जे काही बोललात, त्याचे आम्हीही सभ्यता ओलांडून उत्तर देऊ शकतो.

आपल्या वडिलांवर प्रविण महाजन यांनी का गोळ्या झाडल्या हे कदाचित जगाला माहित नसेल. पण, यामागील अंतर्गत राजकारण माहिती असलेला मी एक आहे. तेव्हा आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार… सभ्यता सोडायला एक मिनीटही लागत नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.