दापोडीत अज्ञात टोळक्याकडून सराईत गुन्हेगाराचा खून

0
636

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – दापोडीतील पवारवस्तीमध्ये पूर्ववैमनस्यातून अज्ञात टोळक्याने डोक्यात दगड घालून बोपोडीतील एका सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला. तसेच एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. ४) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. सुनील विठ्ठल आरडे (वय २६, रा. बोपोडी) असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे. अनिकेत चांदणे हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोपोडी परिसरात राहणारा आरडे हा सराईत गुन्हेगार आहे. तो दापोडीतील पवारवस्तीमध्ये सोमवारी रात्री चांदणे याच्यासोबत बोलत थांबला असताना अज्ञात टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. त्यामध्ये आरडे आणि चांदणे हे दोघेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच आरडे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भोसरी पोलिस तपास करत आहे.