अहमदनगरमध्ये शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देण्यास तयार होतो – मुख्यमंत्री

0
776

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – अहमदनगरच्या महापौर निवडणुकीत आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठींबा देण्यास   तयार होतो. मात्र, निवडणुकीच्या तीन दिवस आधीपर्यंत कोणीही स्थानिक नेते आमच्याशी बोलायला तयार नव्हते, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) मुंबईत पत्रकार परिषदेत केला.

यावेळी फडणवीस म्हणाले की, मी स्वतः आमच्या नेत्यांना सांगितले होते की, शिवसेनेकडून जर प्रस्ताव आला तर त्यांना बिनशर्त पाठींबा द्या. उलट तुम्हीच आमच्या नेत्यांशी बोला आणि आम्ही तुम्हाला पाठींबा देऊ, असे सांगण्याची सुचना स्थानिक शिवसैनिकांनी आमच्याकडे केली. दरम्यान, शिवसेनेकडून स्वतःहून मागणी होत नसल्याने  निर्णय घेण्यास मी आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

राष्ट्रवादीचा पाठींबाबाबत  फडणवीस म्हणाले, महापौर आणि उपमहापौरपदासाठी आमचे उमेदवार होते. आम्ही येथे राष्ट्रवादीला पाठींबा दिलेला नाही, उलट त्यांनी आम्हाला मते दिली आहेत. त्यामुळे पाठिंब्याबाबतचा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा, असे मुख्यमंत्री म्हणाले.