तेलगी प्रकरणाचा राजकीय फटका बसला – छगन भुजबळ

0
530

नाशिक, दि. ३१ (पीसीबी) – तब्बल ३२ हजार कोटी रुपयांच्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्व ७ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने आज (सोमवार) हा निकाल दिला. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी   तेलगी प्रकरणाचा मला नाहक त्रास झाला, त्याचा राजकीय फटका बसला आणि मला राजीनामा द्यावा लागला होता, असे सांगितले.

नाशिकमध्ये पत्रकारांशी  छगन भुजबळ बोलत होते.