अशोक चव्हाण काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?

0
424

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – लोकसभेतील दारुण पराभवानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण  राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. स्वत: अशोक चव्हाण यांनी आपली नांदेडची जागा राखता आली नाही. त्यामुळे ते प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.  

लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसचा सफाया झाला आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची धूळधाण उडाली. काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली. अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात धुव्वा उडाला. भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांनी त्यांचा ४० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

अमेठीतून पराभव झालेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही राजीनामा सादर केला आहे. आज होत असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यावर निर्णय होणार आहे. राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असले तरी त्यांचा राजीनामा फेटाळला जाण्याचीच शक्यता अधिक आहे.