नाना पटोलेंनी राजकीय संन्यास घेण्याचा शब्द पाळावा – नितीन गडकरी

0
458

नागपूर, दि. २५ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यास राजकीय संन्यास घेण्याची घोषणा काँग्रेसचे नाना पटोले यांनी केली होती. आता त्यांनी आपला शब्द पाळावा. अन्यथा भंडाऱ्यातील जनता त्यांना तसे करण्यास भाग पाडेल, असे भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.  

गडकरी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, प्रचारादरम्यान आपण पातळी न सोडता कुणावरही व्यक्तिगत टीका केली नाही. मात्र, पटोले यांनी पातळी सोडून उद्धट भाषा वापली. ५ लाख मतांनी निवडून येण्याचा दावा करताना त्यांनी पराभूत झाल्यास राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली.

या पराभवामुळे त्यांचा अहंकार आणि उन्माद उतरला असेल. आता त्यांनी आपला शब्द पाळावा, अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार त्यांना संन्यास घेण्यात भाग पाडतील, असा इशारा गडकरी यांनी दिला आहे.

पटोले यांनी जातीचे राजकारण करून  इतर समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसपला अपेक्षित मते मिळाली नाही आणि आपचा उमेदवार नव्हता, त्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसला झाल्याने त्यांची मते वाढली आहेत, असे गडकरी म्हणाले.