अल्पवयीन मुलीच्या घरात जाऊन गैरवर्तन करत विनयभंग; मित्रावर गुन्हा दाखल…

0
226

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – एका तरुणाने मैत्रिणीच्या घरात जाऊन तिच्याशी गैरवर्तन करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री चिंचवड येथे घडली.किरण अरुण जानराव (रा. कस्तुरबा गांधी चौक, औंध, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 22 वर्षीय तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांची अल्पवयीन बहीण व घरातील इतर सदस्य एकत्र जेवण करीत होते. त्यावेळी अल्पवयीन मुलीचा मित्र आरोपी हा घरी आला. ‘तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही’, असे म्हणून त्याने सर्वांसमोर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्यावेळी अल्पवयीन मुलीने ‘मला तुझ्याशी लग्न करायचे नाही. तसेच तुझ्याशी कोणतेही नातेसंबंध ठेवायचे नाही’ असे म्हणून धक्का देऊन त्याला दूर केले. त्यामुळे आरोपीने पीडित अल्पवयीन तरुणीचे डोके भिंतीवर आपटून घरातून जात असताना ‘जिथे असेल तिथून तुला उचलून नेतो’, अशी धमकी दिली. महिला पोलीस उपनिरीक्षक दीक्षा झडते तपास करीत आहेत.