अर्थमुव्हींगचे काम देण्याचे आमिष दाखवून देहुरोड येथील एकाला सव्वाबारा लाखांचा गंडा

0
393

देहुरोड, दि. २५ (पीसीबी) – पनवेल येथील १५ कोटी रुपयांचे अर्थमुव्हींगचे काम देण्याचे आमिष दाखवून एकाला सव्वाबारा लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जुलै २०१७ ते १९ एप्रिल २०१९ दरम्यान विकासनगर किवळे येथे घडली.

याप्रकरणी श्रीमंत तुळजाराम शिवशरण (वय ५८, रा. विकासनगर किवळे, देहुरोड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सचिन सिताराम माळी (वय ३८, रा. वाडा गावठाण, नविन पुनवर्सन, भिमा कोरेगाव) आणि सिराज असरफी (रा. नालासोपारा, पालघर) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन आणि सिराज या दोघांनी फिर्यादी श्रीमंत यांना जुलै २०१७ ते १९ एप्रिल २०१९ या कालावधीत पनवेल येथील १५ कोटी रुपयांचे अर्थमुव्हींगचे काम देण्याचे आमिष दाखवले. तसेच त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले. मात्र बरेच दिवस उलटून देखील आरोपींनी श्रीमंत यांना काम ही दिले नाही तसेच त्यांचे पैसे ही परत केले नाही. यामुळे श्रीमंत यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता आरोपींनी त्यांना फक्त २ लाख ६० हजारांची रक्कम दिली. तसेच उरलेली १२ लाख ४० हजारांची रक्क न देता फसवणुक केली. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.