चाकणमध्ये सेक्युरिटी गार्डला मारल्याचा जाब विचारल्याने एकाला दगडाने जबर मारहाण

0
544

चाकण, दि. २५ (पीसीबी) – कॉन्ट्रक्टर आणि त्याचे साथीदार कंपनीच्या नाईट सेक्युरिटी गार्डला मारहाण करतात. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एकाला कॉन्ट्रक्टर आणि त्याचे साथीदारांनी मिळून दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना मंगळवार (दि.२३) रात्री दहाच्या सुमारास चाकण भांबोली गावातील इम्प्रेशन या कंपनीत घडली.

जयवंत गिरझप्पा टकले (वय ५०, रा. घर क्र. ७२६, मातृछाया निवास, विघ्नहर्ता सोसायटी, देहुगाव) असे जखमी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कंपनीचा कॉन्ट्रक्टर किशोर राठोडसह त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी जयवंत हे चाकण भांबोली गावातील इम्प्रेशन या कंपनीत कामाला आहेत. मंगळवारी रात्री त्यांना कळाले कि कंपनीचा कॉन्ट्रक्टर किशोर राठोड आणि त्याचे साथीदार कंपनीचा नाईट सेक्युरिटी गार्ड हर्षलाल बेलदार याला वारंवार दारु पिऊन मारहाण करतात. यावर जयवंत हे याचा जाब विचारण्यासाठी राठेड याच्याकडे गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच आरोपींनी त्यांच्या बलीनो कारने (क्र.एमएच/१४/जीएस/५३५३) ने जयवंत यांच्या डस्टर कार (क्र. एमएच/१४/ईयु/४४९९) ला धडक देऊन नुकसान केले आणि पसार झाले. याप्रकरणी आरोपींविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.