अभिनेत्री प्रिया बेर्डे राष्ट्रवादीत

0
652

पुणे, दि. ४ (पीसीबी) : चित्रपट निर्मात्या आणि अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे लवकरच राजकारणात एंट्री करणार आहेत. येत्या 7 जुलैला प्रिया बेर्डे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांचा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबतची माहिती दिली.

यावेळी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, “सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यांचं मी स्वागत करते. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून नाट्यपरिषदेला केलेली मदत, कलाकार, लोक कलावंतांच्या खात्यात जमा केलेली रक्कम असेल. कोव्हिडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस कलाकारांच्या पाठिशी उभा राहिली. शरद पवार, सुप्रिया ताई, अजित पवार यांनी प्रत्येक घटकाचा विचार केला. त्यामुळे प्रिया बेर्डे यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राष्ट्रवादी हा पक्ष आपला पक्ष वाटतो. राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि कला विभागाच्या वतीने सातत्याने कलाकारांच्या समस्या सोडवल्या जातात. या विभागाच्या वतीने प्रिया बेर्डे यांना कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळेल, त्यांचं मी स्वागत करते,” असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.