अबब… शहरात एकाच दिवशी चोरीच्या आठ घटना…!

0
389

पिंपरी दि. २१ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात चोरीचे आठ गुन्हे शुक्रवारी (दि. 20) दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सहा दुचाकी, एक इको गाडी आणि केबल वायर असा एकूण दोन लाख 60 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

दत्तवाडी आकुर्डी येथून 80 हजार रुपये किमतीची एक इको कार चोरीला गेली आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरगाव येथून शेतातील खोलीतून अज्ञात चोरट्यांनी 40 हजार रुपये किमतीची 600 फूट लांब केबल वायर चोरून नेली. याप्रकरणी शिरगाव चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण, चिखली, हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सहा दुचाकी चोरीला गेल्या आहेत. चाकण मधून 20 हजारांची एक, चिखली मधून अनुक्रमे 20 हजार, 30 हजार, 20 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. तर हिंजवडी मधून 30 हजार आणि वाकड मधून 20 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेत आहेत.