जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून भंगार व्यावसायिकाला जीएसटीची केस करण्याची धमकी देत पैशांची मागणी; दोघांना अटक

0
234

चिखली, दि. २१ (पीसीबी) – जीएसटी अधिकारी असल्याचे भासवून दोन तोतयांनी एका भंगार व्यावसायिकाला त्याच्यावर जीएसटीची केस करण्याची भीती दाखवली. तसेच जीएसटीची केस न करण्यासाठी पैशांची मागणी केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 20) दुपारी पावणे चार वाजता कुदळवाडी येथे करण्यात आली.

मनोजकुमार छबीनाथ, ओमप्रकाश जगदंबा प्रसाद पाण्डेय (दोघे रा. मुखर्जीनगर, उत्तर पश्चिम दिल्ली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत याप्रकरणी शादान अब्दुल अजीज खान (वय 27, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सिझा नावाचे भंगार माल खरेदी विक्री करण्याचे दुकान आहे. आरोपी हे जीएसटी अधिकारी नसताना त्यांनी तसे बनावट ओळखपत्र तयार करून जवळ बाळगले. आपण जीएसटीचे अधिकारी आहोत, असे फिर्यादी यांना सांगून फिर्यादी विरोधात जीएसटीची केस न करण्यासाठी पैशांची मागणी केली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.