अनुसूचित जमातींमध्ये समावेशासाठी धनगर समाजाचा एल्गार

0
1099

मुंबई, दि. १ (पीसीबी) – मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजानेही आजपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. धनगर सामाजाने आपला समावेश अनुसूचित जमातींमध्ये करण्याची मागणी केली आहे.

जसे सुचेल  तसे आंदोलन केले जाईल, असे धनगर समाज आरक्षण कृती समितीतीच्या नेत्यांनी म्हटले आहे.

मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरणे मुश्कील झाले. आणि त्यात आता धनगर समाजाची भर पडणार आहे. कारण आज पुण्याच्या दुधाने लॉनवर राज्यभरातील धनगर एकत्र येणार आहेत. आणि धनगरांचा आदिवासींमध्ये समावेश करा, या मागणीसाठी आंदोलनाची हाक देणार आहेत.

धनगर आणि धनगड अशा दोन वेगळ्या जाती असल्याचा सरकारचा दावा आहे. तसं प्रतिज्ञापत्र आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी हायकोर्टात दिले. मात्र धनगर आणि धनगड ही फक्त प्रशासकीय चूक आहे. राज्यात एकही धनगड अस्तित्वात नाही. त्यामुळे १ सप्टेंबरच्या आत ही चूक दुरुस्त केली नाही तर ५ लाख धनगर मिळून औरंगाबादेत एल्गार पुकारतील असा इशारा धनगर समाजाने दिला आहे.