अनधिकृत बांधकामांच्या शास्तीकर माफीची मर्यादा वाढणार; मुख्यमंत्र्यांचे १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन

0
548

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – भाजप सरकारने सहाशे चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यापुढील क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामांच्या शास्तीकराबाबतही दिलासादायक निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या १५ दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत शास्तीकरांबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मंगळवारी (दि. ९) चिंचवडमध्ये दिले. तसेच पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचा जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांशी चर्चा करून व त्यांना विश्वासात घेऊन मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.