अतानुचा तीर कोरियाच्या वर्मावर

0
226

टोकियो, दि.२९ (पीसीबी) : मानांकन फेरीत अपयशी ठरलेल्या अतानु दासचा एकच तीर वैयक्तिक फेरीत मक्तेदारी असणाऱ्या दक्षिण कोरियाच्या वर्मावर बसला. त्याने दोन वेळच्या ऑलिंपिक विजेत्या कोरियाच्या ओह जिन ह्येक याचा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याची पत्नी दीपिकाकुमारी हिनेही उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे.

मानांकन फेरीत अपयशी ठरलेल्या अतानु दासचे तीर वैयक्तिक फेरीत मक्तेदारी असणाऱ्या दक्षिण कोरियाच्या वर्मावर बसले. त्याने दोन वेळच्या ऑलिंपिक विजेत्या कोरियाच्या ओह जिन ह्येक याचा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याची पत्नी दीपिकाकुमारी हिनेही उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे.

मिश्र दुहेरीच्या लढतीत ऐनवेळी स्थान गमवावे लागलेल्या अतानुची वैयक्तिक स्पर्धेतील कामगिरी अधिक अचूक होती. मानंकन फेरीत ३५व्या स्थानावर राहिलेल्या अतानुने एका अॅरोच्या शूट ऑफमध्ये कोरियाच्या ह्येकचे आव्हान संपुष्टात आणले.

लंडन २०१२ स्पर्धेतील वैयक्तिक आणि सांघिक सुवर्णपदक विजेत्या ह्येक याा शूट ऑफ मध्ये ९ गुणांचाच वेध घेता आला. त्यानंतर अतानुने बुल्स आय साधत ६-५ (१०-९) असा विजय मिळविला.

त्यापूर्वी, सकाळी तैवानच्या डेंग यु चेंग याचे आव्हान ६-४ असे मोडून काढत अतानुने आपली आगेकूच कायम राखली होती. या लढतीत एकवेळ ४-४ अशी बरोबरी होती. पण, त्यानंतर अतानुने अचूकतेच्या जोरावर बाजी मारली.

तो ऑलिंपिक विजेता आहे हे माहित होते. त्यामुळे येथे दडपणाचा विचार सोडून डोके लढवले. ऑलिंपिकमध्ये प्रत्येक लढत ही जणू अंतिम लढत असते. त्यामुळे माझ्यासाठी हा विजय अधिक महत्वाचा आहे.
-अतानु दास

अतानुसमोर आता जपानच्या ताकाहारू फुरुकावा याचे आव्हान असेल. फुरुकावा हा लंडन ऑलिंपिकचा रौप्यपदक विजेता आहे. त्याच स्पर्धेत सांघिक ब्रॉंझही त्याने मिळविले होते. तिरंदाजीच्या बाकी फेऱ्या आणि पदकाच्या लढती शनिवार, रविवारी होतील.

एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणारे अतानु-दीपिका हे पहिलेभारतीय जोडपे आहे. पदकाच्या शर्यतीतही तेच दोघे राहिले असून, त्यांच्याकडून पदकविजेते पहिले भारतीय जोडपे ठरण्याची अपेक्षा आहे.

आजच्या लढतीत कोरियन खेळाडूला लय गवसली नाही. पहिल्या सेटमध्ये त्याला एकदाही दहा गुणांचा वेध घेता आला नाही. अतानुची सुरवातही संथ होती. त्यानंतरही कोरियन खेळाडूने पहिला सेट २५-२६ असा जिंकला. दुसऱ्या सेटला अखेर चौथ्या अॅरोला ह्येकला दहा गुणांचा वेध घेता आला. मात्र, नंतर तो रेड सर्कलपर्यंतच पोचला. अतानुने तीनही प्रयत्नांना ९ गुणांचा वेध घेत २७-२७ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या सेटला पिछाडी भरून काढत त्याने २७-२७ अशा बरोबरीने लढतीमधील रंगत वाढवली. निवृत्तीचा विचार सोडून पुन्हा ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला ह्येक याने २-४ अशी आघाडी मिळवली. पण, निर्णायक सेटला त्याचे तिर भरकटले आणि अतानुने संधीचा फायदा घेत ४-४ अशी बरोबरी साधली. त्यानंतर पुन्हा बरोबरी राहिल्याने वन अॅरोचा टायब्रेक घेण्यात आला. त्यात अतानुने बाजी मारली.