अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जोपासा – एकनाथ पवार

0
684

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जोपासण्याची गरज आहे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे  सत्तारूढ पक्षनेते एकनाथपवार यांनी  व्यक्त केले.

महापालिकेच्या वतीने निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात १ ते ५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधनपर्वाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेबत्रिभुवन, नगरसेविका सुमन पवळे, शर्मिला बाबर, माधवीराजापुरे, प्रियंका बारसे, नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेविका झुंबर शिंदे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, मनोज लोणकर, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, अमित गोरखे, अरूण जोगदंड, मनोज तोरडमल, गणेश क्षीरसागर, सुनिल भिसे, नितीन घोलप, भगवान शिंदे, आशा शिंदे, केशरबाई लांडगे, संजय ससाणे, प्रा.धनंजय भिसे, शिवाजी साळवे, अनिल सौंदडे, महेश खिलारे, उत्तम कांबळे, रमेश भोसले आदी उपस्थित होते.

एकनाथ पवार म्हणाले, “नागरिकांमध्ये समाज प्रबोधन व्हावे व महापुरूषांचे विचार समाजासमोर जावेत यासाठी महापालिका अशा उपक्रमांचे आयोजन करत आहे. त्या माध्यमातून चर्चासत्र परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरूण जोगदंड यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी आभार मानले.