दीपिकानंतर सनी लिओनी ‘भगव्या’ बिकीनीत..!

0
313

देश,दि.२०(पीसीबी) – पठाणचं ‘बेशरम रंग’ नावाचे गाणे व्हायरल झाले आणि दीपिकाच्या नावानं नेटकऱ्यांनी ओरड सुरु केली. तिनं भगव्या रंगाचीच बिकीनी का घातली, तिला हिंदू धर्माचा अपमान करायचा होता का, असे वेगवेगळे प्रश्न यानिमित्तानं नेटकऱ्यांनी दीपिकाला विचारले आहेत. मात्र यासगळ्यात सनी लियोनी ट्रोल होताना दिसत आहे.

दीपिकाची बिकीनी व्हायरल होताच आता बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींचे देखील बिकीनीमधील फोटो व्हायरल होत आहेत. त्यात सनीच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या खास चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत.

सनीचा तो व्हिडिओ व्हायरल होताच त्यावरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. सनीच्या व्हिडिओ किंवा फोटोंना मिळणाऱ्या प्रतिक्रिया या नेहमीच भन्नाट असतात. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, सनी तुझा विषयच वेगळा आहे. मुळात तुझी आणि दीपिकाची तुलना होऊ शकत नाही. काहींनी तर सनी तू देखील भगव्या रंगाचा अपमान केला आहेस. आमच्या भावनांशी तू खेळ केला आहेस. त्याचा अपमान तू केला आहे. अशा प्रतिक्रिया सनीला दिल्या आहेत. सनीनं देखील तिच्या त्या फोटोला लक्षवेधी कॅप्शन्स दिले आहे.