शिवसेनेने ‘त्या’ चार खासदारांना मुद्दाम पाडले – राज ठाकरेंच्या अजब दावा

0
379

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – काही खासदार मंत्री नको म्हणून शिवसेनेने महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीवेळी चार खासदारांना मुद्दाम पाडले. अमरावतीमध्ये आनंदराव अडसुळ पडले, शिरुरमध्ये शिवाजी आढळराव पाटील, रायगड अनंत गीते पडले तसेच औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे पडले असा दावा राज ठाकरेंनी केला आहे. तसेच काँग्रेसचा एक खासदार जो शिवसेनेत होता आणि काँग्रेसमध्ये गेला नेमका तोच खासदार निवडून आला असेही राज यांनी सांगितले. मुंबई येथे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

यावेळी बोलताना राज यांनी ईव्हीएमवरुन केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. २३ मेला लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात २८ पैकी २५ जागांवर भाजपचे खासदार निवडून आले, तर पुढच्या चारच दिवसात त्याच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस मोठ्या प्रमाणावर निवडून आली कशी? तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या मतपत्रिकांवर घेतल्या गेल्या असे त्यांनी सांगितले. एखाद्या मतदारसंघात लाख मतदान झाले असेल तर तिथे लाख २० हजार मतदान मोजणीच्या वेळेस समोर येऊच कसे शकते, बरे निवडणूक आयोगात जाऊन देखील न्याय मिळत नाही ना न्यायालयांमध्ये असा आरोपही त्यांनी केला.