TCS मध्ये 35 हजार पदांवर फ्रेशर्सची भरती

0
583

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) : TCS जगातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान (IT) सेवा देणारी कंपनी आहे. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस, टीसीएस ७८ हजार पदवीधरांची भरती करण्याचे लक्ष्य साध्य करणार आहे. या दिशेने कंपनीने ३५ हजार नवीन पदवीधरांच्या नियुक्तीसाठी नोटीस जाहीर केली आहे. टीसीएस भविष्याचा विचार करुन कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणार आहे. जी अँड टी लीडर्स तयार करण्यासाठी कॉन्टेक्चुअल मास्टर्स आणि एलिव्हेट सारखे कार्यक्रम वाढविले जात आहेत.

सध्या भारतातील अनेक IT कंपन्या इंजिनिअरिंग आणि इतर पदवीधर फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी देत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भारतातील नामंकित आणि मोठी IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये लवकरच काही फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी मिळणार आहे. यासाठीची अधिसूचना TCS कडून जारी करण्यात आली आहे. या नावानं ही भरती घेण्यात येणार आहे. यामध्ये 2022, 2021, 2020 या बॅचमधून पास आउट झालेल्या काही उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

पात्रता :
-TCS मध्ये अप्लाय करण्यासाठी उमेदवारांनी Maths, Statistics, Physics, Chemistry, Electronics, Biochemistry, Computer Science, IT या मधBCA, B.Sc पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
-उमेदवार हे 2020, 2021 आणि 2022 या बॅचेसमधून पास आउट झाले असणं आवश्यक आहे.
-उमेदवारांना संपूर्ण शिक्षणात 5 किंवा 50% पेक्षा जास्त CGPA असणं आवश्यक आहे.
-2022 मध्ये पास ऊत होणाऱ्या उमेदवारांना एक बॅकलॉग माफ असणार आहे. मात्र त्या आधीच्या बॅचमधील उमेदवारांचा बॅकलॉग नसावा.
-उमेदवारांची संपूर्ण शिक्षणादरम्यानची गॅप ही दोन वर्षांपेक्षा अधिक नसावी.

-यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2021
-परीक्षेची तारीख 19 नोव्हेंबर 2021
-TCS मधील या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही सुरुवातीला परीक्षा घेऊन आणि त्यानंतर मुलखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
-या परीक्षेत Verbal Ability वर 24 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना 30 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.
-यानंतर Reasoning Ability वर 30 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना 50 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.
-यानंतर Numerical Ability वर 26 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना 40 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.
-अशाप्रकारे एकूण 80 प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि त्यासाठी 120 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे.